शिवसेना नविन पनवेल शहराची सिडको कार्यालयावर धडक….
  नवीन पनवेल / प्रतिनिधी :- नविन पनवेल शहरात रस्त्यांची पूर्णपणाने दुरावस्था झाली आहे, तसेच जागोजागी गटारांची झाकणे उघडी आहेत. गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले रस्ते देखील तसेच ठेवले आहेत ज्यामुळे रस्त्यावरून चालताना नागरीकांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बरेच अपघात देखील होतात. अशा अनेक समस्यांवर अभियंता मोहिले यांच्या सोबत चर्चा करून लवकरच यावर मार्ग काढून सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी पनवेल - नविन पनवेल उपमहानगरप्रमुख यतिन देशमुख ,नविन पनवेल शहरप्रमुख रूपेश ठोंबरे ,शहर संघटक जगदीश शेळके, माजी 
शहरप्रमुख विजय शेटये, उपमहानगर सांघटिका मंदाताई जंगले, शहर संघटिका अपूर्वा प्रभू , 
उपशहर संघटक सुगंधा शिंदे, माया देवडे, विभाग संघटक वैशाली थळी, शारदा सुरवसे, वैशाली घाग,उपशहरप्रमुख अतुल मोकल,किरण तावदरे, संजय गोवेकर विभाग संघटक, राजेश वायंगणकर उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख रवी पाटील , योगेश चव्हाण, सुकेश भोपी, आशुतोष शिंदे , सिद्धेश गुरव, शिवसैनिक जयंत पाखरे , अविनाश  गव्हाणकर , सत्यवान गायकर उपस्थित होते.
Comments