मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रभागातील पावसामुळे पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात

पनवेल / वार्ताहर :- यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभागातील बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरील ड्रेनेज झाकणांच्या बाजूला असलेल्या सिमेंट मटेरियल  वाहून गेल्यामुळे खड्डे पडले होते,तसेच काही ठिकाणी रस्ता ही खराब झाला होता.खड्यांमुळे रहदारीला पण अडथळा होत होता.पावसाने उसंत घेतल्यामुळे हे सर्व खड्डे बुजवण्याच्या कामाला नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने सुरुवात झाली.पहिल्या टप्प्यात प्रभागातील रिलायन्स फ्रेश चौक,ठाणा नाका रोड, चिंतामणी हॉल समोरील रस्ता, सहस्त्रबुद्धे हिस्पिटल चौक, वाल्मिकी नगर, परदेशी आळी ते सावरकर चौक, या ठिकाणी असलेले खड्डे बुजवण्यात आले. नगरसेवक विक्रांत पाटील तत्परतेने प्रभागातील समस्या सोडवतात त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Comments