अबोली रिक्षा महिला चालक व पुरुष रिक्षा चालकांचे केले मोफत लसीकरण .....

पनवेल/वार्ताहर :-  कोरोनाने अनेकांच्या व्यवसायाची घडी विसकटली आहे त्यात रिक्षा चालकांला मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत आहे. सध्या लसीकरणाचा तुटवडा सर्वत्र जाणवतो पैसे देऊन रिक्षा चालकांना लस घेणं अवघड असल्याने अनेक रिक्षा चालक लस घेत नाहीत, त्यामुळे कोरोनाने अनेकांना जीव गमावावे लागले आहेत.
याचाच विचार करून (Dow Chemical International Pvt Ltd, croda, Evonik India Pvt Ltd, owens-Corning (India) Pvt Ltd, ) डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड , क्रोडा एविनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड , ओवेन्स कॉर्ननिग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड. या कंपन्यांच्या सहकार्याने आणि फ्रीडम फॉर यु फांऊंडेशन यांच्या माध्यमातुन पनवेल मध्ये रिक्षा चालकांचे लसीकरण तसेच, बिगारी कामगार, एस टी ड्राइवर, ट्रान्सपोर्टचे ड्राइव्हर, आदिवासी नागरिक यांना पनवेल येथील पटवर्धन हॉस्पिटल येथे कॅम्प लावून हजारो मोफत लसीकरण केले यासाठी विशेष मेहनत मा. श्री. अविनाश पाटील यांनी घेतली.

आमच्या रिक्षा चालकांनसाठी लस उपलब्ध करून दिल्याबद्दल रिक्षा प्रतिनिधी पत्रकार  संतोष शिवदास आमले, बाळासाहेब झोडगे, मच्छिंद्र पाटील, सौ पूनम शिवशरण, व रिक्षाचालकांनी आभार मानले.
Comments