१५ वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी तीन जणांना कळंबोली पोलिसांनी घेतले ताब्यात...



पनवेल दि. २७  (संजय कदम)- एका १५ वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी तीन जणांना कळंबोली पोलिसांनी घेतल्याने या खूनाची उकल झाली आहे.             
कळंबोली पोलीस ठाणे , हद्दीत दिनांक 23/08/2021 रोजी सकाळी 07:00 वा.चे सुमारास पुजा भवानी डेअरी फार्म समोरील रोडचे कडेला , स्टेट बँकेजवळ , से . 5 ई कळंबोली या ठिकाणी एक 15 वर्षीय युवक जखमी अवस्थेत निपचित पडलेला आढळून आलेला होता त्यास उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय , पनवेल येथे दाखल केले असता , त्यास तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केल्याप्रमाणे सदर प्रकरणी कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हयाचे घटनास्थळी विपिन कुमार सिंह , पोलीस आयुक्त, नवी मुंबई , जय जाधव , पोलीस सह आयुक्त , नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली , शिवराज पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -2 , पनवेल , भागवत सोनवणे , सहा . पोलीस आयुक्त , पनवेल विभाग यांनी तपासाबाबत दिलेले सुचना व मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे पथकाने तपास चालु केला . गुन्हयातील नमुद मयत मुलाचे आईचे मार्फतीने मयताची सर्वप्रथम ओळख पटवण्यात आली . त्याचे नाव नितेश सुनिल दुबेदी , वय- 15 वर्षे , रा . कोपरागाव , खारघर असे असल्याचे निष्पन्न झाले . मयत व त्याचे कुटूंबिय हे पुर्वी कंळबोली येथेच राहत होते . दोन महीन्यापुर्वी ते कोपरागाव , खारघर येथे राहण्यास गेलेले आहेत . मयत यास गांजा , दारू , भांग गोळी इ . व्यसनाची सवय होती . त्यासाठी तो कळंबोली परीसरात रात्री अपरात्री फिरून त्याचे मित्रांसह लहान मोठया चो - या करून त्यातून मिळणारे पैशातून नशा करीत असल्याची माहीती समोर आली . त्या दृष्टीने करण्यात आलेले तपासामध्ये तो रात्री उशीरा मयत नितेश दुबेदी हा त्याच्या मित्रांसोबत घटनास्थळापासूनच काही अंतरावर मिनी मार्केटचे आडोशाला दारू पित बसलेला होता . त्या ठिकाणी अजून एक अल्पवयिन मित्र हासुध्दा दारू पिण्यास आला होता . त्यावेळी मयत नितेश दुबेदी याने त्यास त्या ठिकाणी दारू पिण्यास का आला असे बोलून हाताने मारहाण केली होती . त्यावरून त्यात आपसात वादावादी झाली . सर्वांनी त्या ठिकाणी दारू पिल्यानंतर नशेमध्ये त्यांचेत आपसात पुन्हा वादावादी चालु होवुन त्या तिघांनी मिळुन मयत नितेश दुबेदी यास डोश्या बुक्यांनी व काठीने बेदम मारहाण करून ते निघून गेले. यात त्याचा मृत्यु झाला होता. गुन्ह्यामध्ये कोणताही धागादोरा नसताना मयत याची पार्श्वभूमी व इतर सर्वकश बाबींचा बारकाईने व कौशल्याने तपास करून मयतासोबत दारू पिणारे व नंतर गुन्हा करणारे आरोपी निष्पन्न करून कळंबोली पोलीस ठाणेकडील अधिकारी अमलदार यांनी सदरचा गंभीर असा गुन्हा उघडकीस आणलेला आहे . सदर गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तपासकामी कळंबोली पोलीस ठाणेचे वपोनि संजय पाटील, सपोनि नितीन कुंभार , पोउपनिरी मनेश बच्छाव व गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सर्व अंमलदार यांनी गुन्हा घडल्यापासुन अहोरात्र मेहनत घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावलेली आहे .              

फोटोः खूनातील गुन्ह्याची माहिती देताना पोलिस अधिकारी
Comments