गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांना रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली...

पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांना बिमा नाका कळंबोली येथे रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
5 दशके आमदारकीची दैदिप्यमान कारकिर्द साकारणार्‍या 11 वेळा आमदार होण्याचा विक्रम करणारे शेतकरी कामगार पक्षाचे दिपस्तंभ भाई गणपतराव देशमुख (आबा) यांना रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यानिमित्ताने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी श्रीकांत फाळके, तुकाराम सरक, हणमंत पिसाळ, सुरेश देवाडिगा, अजय सरगर, संजय शेडगे, निलेश टाकळकर, निलेश दिसले, संभाजी चव्हाण, कौलव जाधव, सह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Comments