कार्यालयातील चोरीत रोख रकमेसह लॅपटॉप लंपास....
कार्यालयातील चोरीत रोख रकमेसह लॅपटॉप केला लंपास....

पनवेल दि.21 (संजय कदम)- एका बंद कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी केलेल्या चोरीत रोखरकमेसह लॅपटॉप व पेट्रोल परफ्यूमच्या 76 बाटल्या असा एकूण 78 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना तळोजा फेज-1 परिसरात घडली आहे.
           सुफियान मोहम्मद अनिस सय्यद यांचे से.-10 रसबेरी अपार्टमेंट, शॉप नं-5 येथे रियल इस्टेटचे कार्यालय आहे. सदर कार्यालय बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने शटरची पट्टी कापून आत प्रवेश करून आत असलेले 50 हजार रूपये रोख, 10 हजारांचा डेल कंपनीचा लॅपटॉप व 18 हजारांचे पेट्रोल परफ्यूमच्या 76 बाटल्या असा एकूण 78 हजारांचा ऐवज चोरून नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image