सराईत मोबाईल चोरट्यास खांदेश्वर पोलिसांनी केले गजाआड.....
सराईत मोबाईल चोरट्यास खांदेश्वर पोलिसांनी केले गजाआड....

पनवेल दि.15 (संजय कदम): साराईत मोबाईल चोरट्यास खांदेश्वर पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून एका महिलेचा चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हेगारावर खांदेश्वर पोलिस ठाण्याने व पनवेल रेल्वे पोलिस स्टेशन असे मिळून जवळपास 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
          खांदेश्वर पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिस उपनिरीक्षक पोळ व त्यांचे पथक पनवेल रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालीत असताना एक महिला घाबरलेल्या अवस्थेत त्यांच्यासमोर येऊन तिचा मोबाईल फोन एका इसमाने जबरी चोरी करून रेल्वे स्टेशन बाजूकडे तो पळून गेल्याची माहिती दिली. त्यानुसार वपोनि देवीदास सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पोळ व त्यांचे पथक तसेच आरपीएफ पोलिस यांची मदत घेऊन आरोपी संतोष साहेबराव चव्हाण (वय-26, पंचशीलनगर) यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचा 9 हजारांचा व्हिवो कंपनीचा मोबाईल आढळून आला आहे. सदर आरोपी हा 5.8.2021 रोजी तळोजा कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडला असून त्याने पुन्हा अशाप्रकारे चोरीचे प्रकार सुरू केले आहेत. त्याच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments