पनवेल / वार्ताहर :- पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चिपळूणमध्ये सामाजिक , राजकीय सौंस्थांसह व्यक्ती तसेच विविध ज्ञाती संस्थांकडून मदतीचे ओघ येत आहे . " महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन " नवी मुंबई रायगड यांच्यातर्फे पूरग्रस्तांना मदत करण्यात आली . शुक्रवार दिनांक ३०/०७/२०२१ रोजी " महाराष्ट्रयीन बिल्डर्स असोसिएशन " च्या सि.बि .डी येथील ओफिस मधून १०.टन धान्य भरलेले ट्रक संस्थेचे अध्यक्ष संतोष आंबवणे , व सवस्थापकीय अध्यक्ष सुरेश हावरे व सेक्रेटरी बाबासाहेब भोसडे व सह खजिनदार संतोष उगले ह्यांचा हस्ते श्रीफळ फोडून चिपळूण येथे पाठवण्यात आले . शनिवार दिनांक ३१ / ०७ / २०११ / रोजी , पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चिपळूणमध्ये " महाराष्ट्रयीन बिल्डर्स अससोसिएशन " तर्फे जवळपास ५०० कुटूंबांना १० टन जीवनआवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले . " महाराष्ट्रयीन बिल्डर्स असोसिएशन " च्या टीम ने व तेथील स्वयंसेवकांच्या मदतीने सर्वे करून जिथे मदतीचा हात पोहचला नव्हता तेथे हि १० ठिकाणी पूरग्रस्त कुटूंबां पर्यंत जीवनआवश्यक अन्यधान्य च्या ५०० किटचे वाटप करण्यात आले व काही ठिकाणी मोठ्या गाड्या जाऊ शकत नव्हत्या तर तिथे छोट्या वाहनांचा वापर करून सामान पोचवण्यात आले . चिपळूण मध्ये काही ठिकाणी अशी परिस्तिथी होती कि काही ठिकाणी तर जवळ जवळ दुसऱ्या माळ्या पर्यंत पाणी गेले होते . आता तशी परिस्थिती निवळत आहे परंतु फार गंभीर आहे . काही ठिकाणी चिखल अजूनही साफ करणे शक्य झाले नाही . काही ठिकाणी घराची पडझड झाल्यामुळे आणि दरड कोसळ्यामूळे सर्व काही पुरामध्ये वाहून गेले आहे . अन्यधानाची भरपूर प्रमाणात मदत आलेली आहे व येत आहे , परंतु आता खरी गरज आहे ती त्यांना लागणाऱ्या इतर वस्तू म्हणजे पडझड झालेल्या घरांसाठी घर बांधण्याचे साहित्य व साधन सामुग्री म्हणजे स्टो / गॅस / लायटर , लाईट चे सामान , कपडे व इतर आवश्यक वस्तूची खरी गरज असल्याचे " महाराष्ट्रयीन बिल्डर्स अससोसिएशन " चे अध्यक्ष संतोष आंबवणे यांनी सांगितले . तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन " च्या सर्व सभासदांनी अत्यंत अल्प वेळात जे सहकार्य केले ' त्यामुळेच हे शक्य होऊ शकले असेही अध्यक्ष संतोष आंबवणे ह्यांनी सांगितले ह्या प्रसंगी सेक्रेटरी बाबासाहेब भोसले व सह खजिनदार संतोष उगले गणेश जगताप , गुरुदेव पाटील व इतर मान्यवर मंडळी उपस्थीत होते . .
कोंकण मधील चिपळूण शहरातील ५०० पूरग्रस्त कुटुंबांना "महाराष्ट्रयीन बिल्डर्स अससोसिएशन" चा मदतीचा हात...