लायन्स क्लब तर्फे शेकडो रोपांची लागवड..

पनवेल :-  लायन्स क्लब पनवेल रत्नाच्या वतीने धोदाणी जवळील चिंचवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी आंबा,कांचनार,करंज आदी शेकडो रोपांची लागवड करण्यात आली.
                सदर कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ पनवेल रत्नाचे अध्यक्ष प्रदीप भट्टाचार्य, गाव दत्तक योजनेचे अध्यक्ष विंग कमांडर राजेंद्र महानुभाव,महेश किनरे सचिव,सर्व्हिस चेअरपरसन   दिनेश करिपारा,सरपंच हर्षदा चौधरी,सोमनाथ चौधरी,लायन्स क्लबचे अन्य वरिष्ठ अधिकारी गण,रीजन चेअरपरसन दोनच्या ज्योती देशमाने,ट्रेव्हर मार्टीस,सरोज शर्मा,प्रकाश चराटकर,संजय गोडसे,हरी अरोरा,निर्मला अरोरा,फ्रान्सिस जोसेफ,रुपेश मेहता,सिंधू रामचंद्रन,हरनीश कौर सेठी,राजी सैनी,साई पिल्लई,उमा पिल्लई, निर्मला अरोरा,चंद्रा बोरा,रिनाक्षी बॉथियाल,रोहन देशमुख आदी मान्यवर , पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.   
                 लायन्स क्लब तर्फे चिंचवाडी हे गाव दत्तक घेण्यात आले असून या उपक्रमांतर्गत या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय,शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, वृक्ष लागवड आदी उपक्रम राबविण्यात आले.या वेळी महिला सक्षमीकरण,मुलांना पोषक आहार,तरुण मुला मुलींसाठी प्रशिक्षण तसेच लहान मुलांसाठी शालेय शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे,शाळेचे छप्पर दुरुस्ती आदी कामाचे आश्वासन लायन्स क्लब तर्फे ग्रामस्थांना देण्यात आले.
 
Comments