पनवेल दि.५ (वार्ताहर) :पनवेल परिसरातील सागर रेस्टाँरंटमध्ये पाच दिवसापुर्वी कामाला लागलेल्या एका वेटरने रेस्टारंटमधील 35 हजाराची रोख रक्कम चोरुन पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. हरिष श्रीगी असे या चोरट्यांचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
पनवेल भागात राहणारे सचिन सचदेव यांचे पनवेल भागात सागर रेस्टाँरंट असून त्यांच्या रेस्टारंटमध्ये गत 25 जुलै रोजी आरोपी हरिष श्रीगी हा गेला होता. यावेळी त्याने रेस्टारंट मालक सचदेव यांना कामावर ठेवण्याची विनंती केली. आरोपी हरिष श्रीगी याने लॉकडाऊनपुर्वी सचदेव यांच्या न्यु पंजाब या हॉटेलमध्ये 3 महिने काम केले होते. त्यामुळे सचदेव यांचा त्याच्यावर विश्वास होता. त्यामुळे सचदेव यांनी त्याला आपल्या रेस्टारंटमध्ये कॅफ्टन म्हणून कामाला ठेवले. दरम्यान गत 31 जुलै रोजी सायंकाळी रेस्टारंट बंद झाल्यानंतर रेस्टॉरंटमधील इतर वेटर हे किचनमध्ये असताना कॅशीयर सुब्रतो राय हा चहा पिण्यासाठी बाहेर गेला होता.
यावेळी सुब्रतो राय याने हरिष श्रीगी याला लक्ष ठेवण्यास सांगितले होते. याचदरम्यान, चोरट्या हरिष श्रीगी याने रेस्टारंटच्या गल्ल्यामध्ये जमा असलेली 35 हजाराची रक्कम चोरुन पलायन केले. त्यानंतर रात्री 8.30 वाजता कॅशीयर सुब्रतो राय हा रेस्टारंटमध्ये परतल्यानंतर त्याने रेस्टॉरंटच्या गल्ल्यातील रक्कम मोजली असता, त्यात 35 हजार रुपये कमी असल्याचे आढळुन आले. तसेच त्याठिकाणावरुन हरिष श्रीगी हा देखील पळून गेल्याचे लक्षात आले. त्यानेच रेस्टारंटच्या गल्ल्यातील रक्कम चोरुन नेल्याचे लक्षात आल्यानंतर सचदेव यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.