गाडीचा अपहार....
गाडीचा अपहार....

पनवेल दि.३ (वार्ताहर)- भाडे तत्वावर दिलेली गाडी ताब्यात घेऊन त्याचे भाडे न देता तसेच गाडीही परत न करता गाडीचा अपहार केल्याप्रकरणीची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
          संकेत चिपटे यांची गाडी हरदेव सिंग यांना महिना 15 हजार या ठरलेल्या रकमेने भाडे तत्वावर दिलेली व त्याचा करार करण्यात आला होता. हरदेव सिंग यांनी सुरवातीला नियमितपणे भाडे दिले. परंतु त्यानंतर भाडे देण्यास टाळाटाळ करू लागला त्यामुळे संकेत चिपटे यांनी गाडी परत मागितली असता सदर गाडी परत न देता मोबाईलही परत देऊन तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments