कामोठेतील धृती ने जिंकला ब्युटीफुल स्माईल चा किताब....

पनवेल: 
जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या स्टार मिस टीन इंडिया पिजेंट या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत कमोठ्यातील 15 वर्षीय धृती कुडले हिने आपली वेगळी छाप उमटवली आहे. तिने या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेऊन 'मिस टिन इंडिया मोस्ट ब्युटीफुल स्माईल' चा किताब जिंकला आहे.

या क्षेत्राची आवड पाहता स्टार मिस टीन इंडिया पिजेंट या  स्पर्धेत 14 ते 19 वयोगटात जवळपास दीडशे हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंतिम स्पर्धेसाठी  20 जणांच्या यादीत धृतीने स्वतःची वेगळी छाप उमटवली आणि स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. अखेरीस प्रश्न उत्तर फेरी आणि स्पर्धेचे निरीक्षण फॅशन क्षेत्रातील सुमन राव, मिस्टर वर्ल्ड 2016 रोहित खंडेलवाल, स्टार  entertainment production che संस्थापक ऋषी रक्षित तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. धृती इयत्ता 10 वीत आहे. यापूर्वी औरंगाबाद येथे सौंदर्यवतींच्या स्पर्धेत धृतिने सर्वोत्तम यश मिळवले होते. सध्या तिच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments