चांगल्या प्रतीचा मोबाईल मिळावा यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघाने सेवा प्रकल्प कार्यालयात मोबाईल केले जमा

पनवेल दि. 20 (वार्ताहर)- पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईलचे वाटप 2019 साली करण्यात आले होते. सदर मोबाईलची वॉरंटी दोन वर्षे कालावधी असून तो कालावधी मे 2021मध्ये संपला आहे. त्यामुळे देण्यात आलेला मोबाईल हा हॅंग होत असल्याने तसेच लवकर गरम होत असल्याने त्या मोबाईलवर काम करणे कठीण झाल्याने अखेर आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल येथील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालयात हे जमा करण्यात आले.             देण्यात आलेले मोबाईल हे निष्कृष्ट दर्जाचे आहेत. त्याच्या दुरूस्तीसाठी नाहक भुर्दंड अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बसतो. याच्यात माहितीसुद्धा अपूरी राहत असल्याने कामही पूर्ण होत नाही. तरी चांगल्या प्रतीचा मोबाईल देण्यात यावा या मागणीसाठी आज त्यांनी आपल्याकडील मोबाईल जमा केले आहेत.
          
फोटोः पनवेल येथील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालयात जमा करताना कर्मचारी
Comments