ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स यूनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..

पनवेल दि.१६ (वार्ताहर)- ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स यूनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या वेळी यूनियनचे पदाधिकारी, शिपिंग क्षेत्रातील मान्यवर आणि सभासद उपस्थितीत होते. 
          सभेची सुरवात समुद्री अरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून  अभिवादन केले, संस्थापक अध्यक्ष संजय वासुदेव पवार आणि पदाधिकऱ्याच्या हस्ते दिपप्रज्वलण करून करण्यात आली. 
यूनियन चे कार्यअध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे यांनी आपल्या प्रारंभीक भाषणात शिपिंग क्षेत्रात वैश्विक महामारी मुळे होणाऱ्या नवीन बदल आणि अडचणीं यांचे विश्लेषण केले. तसेच यूनियन च्या खजिनदार श्रीमती. शितल शिवाजीराव मोरे यांनी वार्षिक आर्थिक अहवाल सादर केला आणि यूनियनचे मेंबर्स कसे वाढवता येतील त्यासंबंधी काही सूचना केल्या. त्यांनंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष संग्राम सोंडगे यांनी मागील वर्षीच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. तसेच यूनियनने मागील वर्षभरात केलेल्या अनेक कामाची चित्रफीत देखील दाखवण्यात आली. डॉ. अमोल मोरे यांनी डी जी शिपिंग कडून परवानगी असलेल्या वैद्यकीय संस्थान कडूनच जहाजावर जाण्याआधी आपली योग्यती वैद्यकीय तपासणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात यूनियनच्या कामाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

सभेची सांगता यूनियन चे संस्थापक/ अध्यक्ष संजय वासुदेव पवार यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणाने झाली, त्यांनी आपल्या भाषणाने सर्व श्रोते आणि पदाधिकाऱ्याना अजून चांगले काम करण्यासाठी प्रेरित केले. सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले. पुढे सर्व सभासद आणि पदाधिकाऱ्याना सन्मानचिन्ह आणि तुळशीच रोप देवून सन्मानित करण्यात आले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील, सभेची संपूर्ण व्यवस्थापणेची जवाबदारी अक्षय कोळी आणि रोशन कोळी या युवा कार्यकर्त्यांनी उत्तमरित्या पार पाडली. सभेसाठी प्रमुख उपास्थिति कॅप्टन सुनील पाठक, स्वरूप पाटील, अॅड.अरुण जोशी, गणेश पवार, प्रमोद कुमार सिंग, निरंजन देशमुख, दत्ता चौगुले, आश्विन अघामकर, सुरेश खाडे, बबलू सिंग यादव, सुजीत पोळ, विकास कांबळे, विघ्नेश कोळी आणि कार्यकर्ते, सभासद यांनी लावली.
        


फोटो- ऑल इंडिया सिफेरर्स अँड जनरल वर्कर्स यूनियनचे पदाधिकारी व सभासद
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image