केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ खारघरमध्ये शिवसेनेचा निषेध मोर्चा...

पनवेल दि.24 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्य विधानामुळे सर्व महाराष्ट्रभर शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. तसेच त्यांच्या बद्दल अत्यंत हीन दर्जाचे आक्षेपार्य विधान केले असून  या अनुषंगाने शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत (पनवेल विधानसभा) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पनवेल विधानसभा यांच्या वतीने राणे यांच्या विरोधात खारघर येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच नारायण राणे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी खारघर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.
सदर आंदोलनास जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्यासह उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत,यतीन देशमुख, सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख , युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, सर्व शहर अधिकारी,, महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, उपतालुका संघटिका सौ. टीया अरोरा-धुमाळ, उपमहानगर संघटिका सौ. रीना पाटील, शहर संघटिका सौ. अपूर्वा प्रभू, विभाग संघटिका सौ. संगीता राऊत आदि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ः निषेध मोर्चा
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image