पनवेल परिसरात वीज चोरीचे वाढते प्रकार ; गुन्हे दाखल..
पनवेल दि. १८ (वार्ताहर): गेल्या काही महिन्यांपासून पनवेल परिसरात अनेक ठिकाणी वीजचोरीचे वाढते गुन्हे होत असून याबाबत सर्वच पोलिस ठाण्यात कारवाईच्या तक्रारी करण्यात आल्या असून त्यानुसार म.रा.वि.वि.चे अधिकारी व कर्मचारी गुन्हे दाखल करीत आहेत.
           अनेक ठिकाणच्या राहत्या घरामध्ये फार्महाऊस, हॉटेल व इतर कंपन्या याठिकाणी बेकायदेशीररित्या किंवा युनिटची अनधिकृत वीज चोरी करून वीज वापरली जात आहे व शासनाची फसवणूक करण्यात येत आहे. याची माहिती म.रा.वि.वि.चे अधिकारी व कर्मचारी यांना मिळताच ते सदर ठिकाणी जाऊन अशा प्रकारे वीज चोरी करणाऱ्यांविरूद्ध संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत आहे. अशा धडक कारवायांमुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Comments