क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशने जपली सामाजिक बांधीलकी, झोपडपट्टीतील मुलांसोबत साजरा केला रक्षाबंधन
पनवेल :- भाऊ आणि बहिणीचे नाते अतूट असते. याच नात्याचा उत्सव साजरा करणारा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा दिवस भाऊ-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक या स्वरुपात साजरा केला जातो. यंदा जगभरात रविवारी म्हणजे २२ ऑगस्टला रक्षाबंधन सण साजरा होत आहे. भाऊ आणि बहिणीचं नातं म्हणजे ‘तुझं-माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’ अगदी असंच असते. 
या सणाच्या निमित्ताने क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशनच्या माध्यमातून नवीन पनवेल येथील MTNL जवळील झोपडपट्टीतील लहान चिमुकल्यांसमवेत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला.
झोपडपट्टीतील गरीब चिमुकल्या मुलांना राख्या बांधून व खाऊ वाटप करून खरंतर मनाला खूप आनंद वाटला आणि या दुर्लक्षित मुलांवर चांगले संस्कार व शिक्षण त्यांना मिळणे काळाची गरज असल्याचे लक्षात आले. त्यामुळेच त्यांच्या हातावर राखी बांधून त्यांना शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे हे देखील पटवून दिले. सगळ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे स्वतः शिकून स्वतः च्या पायावर उभे राहून उद्याचे भविष्य घडवण्याची जबाबदारी या मुलांची आणि त्यांच्या पालकांची आहे. हे त्यांना समजावून सांगितले याचा सार्थ अभिमान वाटला. आणि आपले बोलणे त्यांच्या लक्षात येऊन त्यांनीही मला चांगले शिक्षण घेऊन आपला पाया मजबूत करण्याचे वचन दिले हीच रक्षाबंधनची भेट आज मला मिळाली हे निश्चित झाले. तसेच आजचा आनंद ह्या लहान मुलांना गगनात मावेनासा झाला, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आजच्या दिवसाचे मोल खूप मोठे आहे हे जाणवले,
     त्यामुळेच या दिवसाचे महत्व खूप आहे. ह्या गरीब मुलांना ह्या जोपडपट्टीत कोणतीच सोय नाही ही समस्या सोडवण्याचे देखील आश्वासन दिले. बहिणीचे प्रेम आभाळाच्या मायेसारखे असते, ती दूर असली तरीही दुःख नसते,
दुराव्यामुळे नाती होतात कमकुवत,
पण बहीण-भावाचे प्रेम, कधीही कमी होत नाही...

Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image