पनवेल, दि. २९ (वार्ताहर) ः पाडा मोहल्यात बरेच दिवस झाले साफ सफाई व्यवस्थित होत नव्हती.त्याबद्दल तेथील नागरिकांनी ही समस्या कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे मांडली.विक्रांत पाटील यांनी त्वरित महानगरपालिका अधिकार्यांशी संपर्क साधून पाडा मोहल्यात सफाई करून घेण्यास सांगितले. महानगरपालिका सफाई विभागाने तक्रारीची दखल घेत पाडा मोहल्यात साफ-सफाई करून घेतली.
आपल्या प्रभागातील प्रत्येक विभागात जातीने लक्ष घालून समस्यांचे निरसन करून घेणे हे नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या दिनचर्येचा भाग असल्याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.