तळोजा परिसरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात विशेष उपाययोजना करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मागणी

पनवेल दि.17 (वार्ताहर)- तळोजा वसाहत मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्याने गेल्या काही महिन्यांपासून येथील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुशंगाने तळोजा 1 व तळोजा 2 परिसरात पोलिस गस्तीसह विशेष उपाययोजना करण्याची मागणी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
             तळोजामध्ये वाढत्या चोरीमुळे आज तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांना उपाययोजना व गस्त वाढीविण्यासाठी निवेदन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल, कार्याध्यक्ष शहबाज फारूक पटेल, युवक राष्ट्रवादीचे रणजित नरुटे, चाँद शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, तळोजा वसाहत तळोजा 1 व तळोजा 2 मधील वाढती लोकसंख्या तसेच वाढता व्यापारामुळे शहरीकरण वाढले आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यानच्या काळात या भागात चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. तरी या संदर्भात या भागात पोलिस गस्त वाढावी व येथील व्यापारी वर्गाचे होणारे नुकसान थांबवावे त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
          फोटोः वरिष्ठ पोलिस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल, कार्याध्यक्ष शहबाज फारूक पटेल, युवक राष्ट्रवादीचे रणजित नरुटे, चाँद शेख आदी पदाधिकारी
Comments