पनवेल दि. १७ (संजय कदम)- गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेल येथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील साळुंखे यांना नुकतेच नवी मुंबईचे पोलिस आय़ुक्त बिपीनकुमार सिंग यांच्या हस्ते पोलिस महासंचालकाचे विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील दत्तात्रय साळुंखे हे दिनांक 01/11/1990 पासून पोलिस दलात आहेत. त्यांची पोलीस दलात 31 वर्षे सेवा झाली आहे. त्यांची सेवा कालावधीत सन 2006 साली ठाणे रायगड मुंबई नवी मुंबई परिसरात झाली असून घरात घुसून खुना सह दरोडा टाकणारे पारधी गँगची गुप्त रित्या कौशल्य पूर्वक माहिती काढून त्यांना अटक केली. तसेच हायवेवरील वाहनचालकांना लुटणारे कातकरी गँगला शिताफीने पकडले. सन 2008-09 साली मोटरसायकल चोरीचे आरोपी पकडून 50 मोटरसायकल हस्तगत केल्या. सन 2012-13 मध्ये पनवेल तालुका भागात ग्रामीण भागात एकत्रित झालेले चार खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडले. 2019-20 साल इराणी गॅंग आरोपी पकडून त्यांच्याकडून चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले. सन २०२०-२०२१ मध्ये चेन स्नॅचिंगचे ३० गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांना अद्याप पावेतो 277 बक्षीसे शासनाकडून मिळून आली आहेत. या कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांना नुकतेच पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्या हस्ते हे पदक देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. या त्यांच्या यशाबद्दल सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी व कुटूंबियांनी त्यांचे कौतुक केले आहे.
फोटोःपोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्या हस्तेपोलिस महासंचालकाचे विशेष सेवा पदक स्विकारतानासहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील साळुंखे