पेट्रोल पंपावर मोजमापात फसवणूक.....
पेट्रोल पंपावर मोजमापात फसवणूक....

पनवेल दि.01 (वार्ताहर)- जनजागृती ग्राहक मंच, पनवेलचे तालुका उपाध्यक्ष सुभाष फडके यांनी रविकांत पेट्रोलियम, खांदा कॉलोनी,पनवेल, यांच्याबाबत केलेल्या तक्रारीनुसार वैध मापनशास्त्र यंत्रणेने  तपासणी केली असता ग्राहकांना पेट्रोल कमी मिळत असल्याचे सिद्ध झाले. सदर पेट्रोलपंपावरील ३ नोझल बंद करण्यात आले आहेत. याबाबत पेट्रोल पंप मेनेजरसोबत बोलने केले असता मशीनला जो टोलरंस आहे तो लिमिटमध्ये असल्याने फेरपड़तालनी करून शासनाला त्याचे पैसे भरून तिन्ही नोझल पुन्हा सुरू केले असल्याचे सांगितले.           
काही दिवसांपूर्वी सुभाष फडके हे रविकांत पेट्रोलियम इंडियन ऑइल, खांदा कॉलनी सेक्टर 8, पनवेल, या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास गेले असता त्याना पेट्रोल पंपाचे मापामध्ये शंका आली म्हणून ते घेत असलेले पेट्रोल हे शासकीय शासन मान्य मापटयाने मापूनच मिळावे म्हणून पेट्रोल पंपाचे कर्मचारी व मॅनेजर यांच्याकडे मागणी केली. त्यांनी सुभाष याना पेट्रोल मापट्याने मापून मिळणारच नाही. आपण कोण आहात? आपले आय कार्ड दाखवा? व याबाबत आपण कुठेही तक्रार करू शकता असे उघडपणे सांगितले व असभ्य वर्तन केले असल्याचे सुभाष फडके यांचे म्हणणे आहे. पनवेल परिसरात अशा डिझेल, पेट्रोल विक्रीमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. रविकांत पेट्रोलियम इंडियन ऑइल, खांदा कॉलनी येथे अचानक धाडसत्र करून डिझेल व पेट्रोल विक्रीचे मोजमापाचा निरीक्षण व परीक्षण करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जनजागृती ग्राहक मंच,पनवेलचे तालुका उपाध्यक्ष सुभाष फडके यांनी केली होती. त्यानुसार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग वैध मापनशास्त्र यंत्रणा यानि तपासणी केली असता पाच लिटरच्या प्रमाणित कोनीकल मापाने व पिपेटने सलग तीन वेळा डिलिव्हरी तपासली असता अनुक्रमे नोझल एन 2 पेट्रोल 15 मिली, 10 मिली, आणि 10 मिली कमी आढळली. यावेळी ठराविक मुदतीत या संदर्भातील त्रुटी दूर कराव्यात असे वैधमापन शास्त्र यंत्रणेने कळवले आहे.
Comments