राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत आर्या पाटील प्रथम..
 
पनवेल / प्रतिनिधी :- शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्ट अँड हॉबीज फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑन लाईन चित्रकला स्पर्धेत आर्या सुधीर पाटील हिने इयत्ता तिसरी ते नववी गटात प्रथम क्रमांक पटकावला. 
सदर स्पर्धेत मुंबईसह भारतातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्पर्धेस उत्तम प्रतिसाद दिला.विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सदर ऑन लाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली असे आर्ट अँड हॉबीज फाउंडेशनच्या चेअरमन सारिका बिरारी यांनी यावेळी सांगितले.
तीन गटात झालेल्या या स्पर्धेत वी.शालिनी,शुश्रुत पंडीत, श्रेया घागस, प्रत्युश पोतदार, मनवा हिसवानकर, अथर्व काकडे, अबीर शिडरकर, आदित्य भापकर, परिधी पाटील, सारीन दाभाडे, आर्या सुधीर पाटील, विश्वा रावल, मानसी करपे , आर्या जाधव,-मायेशा सिंग, वी.मैथिली,श्रेया जाधव हे विद्यार्थी विजेते ठरले. 
विजयी स्पर्धकांना आर्ट अँड हॉबीज फाउंडेशन च्या चेअरमन सारिका बिरारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. सदर स्पर्धेस शशिकांत महाळुंग,सारिका बिरारी, प्रविण काटेपल्लेवार,विवेक यावलकर हे परिक्षक म्हणून लाभले होते.
स्पर्धेच्या निमित्ताने मुलांच्या कल्पकतेचे अविष्कार पाहून राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग व वेट लिफ्टिंगचे अष्टपैलू खेळाडू अरुण पाटकर, तथास्तु ज्वेलर्स चे संजय बिरारी,आर्या वनौषधी संस्थेचे सुधीर पाटील, जयश्री जाधव,रुद्रा बिरारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
Comments