पनवेल : वार्ताहर
युवासेना पनवेल ग्रामिण व प्रभाग क्र.२ यांच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने युवासेना वावंजे विभाग अधिकारी मनोज शिवराम कुंभारकर, युवासेना विभाग अधिकारी प्रभाग क्र .२ चे जीवन अनंत पाटील, युवासेना वावंजे विभाग चिटणीस / ग्रा.पं.सदस्य, चिंध्रण शंकर चाहू देशेकर यांच्यावतीने करूणेश्वर वृद्धाश्रम, भानघर (नेरे) येथे फळे व खाद्य वाटप कार्यक्रम शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी शिवसेना पनवेल तालूका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्यासह उपतालुकाप्रमुख शांताराम कुंभारकर, उपतालुकाप्रमुख बबन फडके, विभागप्रमुख विश्वास पेटकर, विभागप्रमुख दत्ता फडके, विभागप्रमुख प्रमोद पाटील, युवासेना उपविभाग अधिकारी दिनेश भोईर, शाखाप्रमुख नितीन माळी, शाखाप्रमुख सागर पाटील, उपशाखाप्रमुख नंदु म्हात्रे, अजित पालकर, सुरेंद्र आंबेकर, सुधीर फडके, मनोज फडके, गजानन पाटील, जानु उघडा, कमळाकर उघडा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.