अबोली महिला रिक्षा संघटनेची भरारी, मानखुर्द येथे चौदाव्या शाखेची स्थापना....

पनवेल / प्रतिनिधी 
पनवेल परिसरात कार्यरत असणाऱ्या अबोली महिला रिक्षा संघटनेची चौदावी शाखा मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे स्थापन झाली आहे, मानखुर्द येथे पंधरा सदस्य असून यामध्ये आणखी वाढ होणार आहे. मानखुर्द येथील शाखेमध्ये आणखी महिलांची संख्या वाढत असून येथील रिक्षा चालक महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडीवण्यासाठी मानखुर्द विभागाच्या अध्यक्ष पदी अनिता राणे तर उपाध्यक्षपदी मनिषा गवस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
तसेच सर्व रिक्षाचालक महिलांनी रितसर सभासद फॉर्म भरून संघटनेत सहभागी झाल्या आहेत. यापूर्वी पनवेल, कळंबोली, कर्जत, खोपोली, कोपरखैरणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोबिवली, मानपाडा, नेरुळ, घणसोली, रबाळे नंतर आता मानखुर्द येथे चौदाव्या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. 
यावेळी उपस्थित अबोली महिला रिक्षा संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष संतोष भगत, तर रबाळे घणसोली विभागीय अविता निबरे, नेरुळ विभागीय अंजना शिंदे तसेच मानखुर्द येथील रिक्षा चालक महिला उपस्थित होत्या. 
त्याचप्रमाणे संघटने तर्फे विविध कार्यक्रम वेळोवेळी राबवले जातात असे यावेळी संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत यांनी सांगितले.
Comments