विशाल सावंत आणि मित्र परिवाराचा पूरग्रस्तांना मदतीचा हात...

पनवेल/प्रतिनिधी: महाड येथे झालेल्या पूरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याना आता सर्व स्तरातून मदत पोहोचत आहे. पनवेलमधील विशाल सावंत आणि मित्र परिवाराने देखील 30 प्रकारच्या दैनंदिन वापरातील साहित्य 70 कुटुंबातील नागरिकांपर्यंत पोहोचविले.

महाड येथील दादली, शिरवली व महाड शहरात विशाल सावंत आणि मित्र परिवाराने पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्याचे ठरवले.यासाठी फक्त एक मॅसेज मित्र आणि आप्तेष्टांपर्यंत पाठवला गेला आणि दोन दिवसात  सत्तर जणांना पुरेल असे तीस वस्तूंचे 70 कीट तयार केले गेले. त्यामध्ये पाणी बोटल्स,चटई, मसाला, साखर,मूग, चणे, चहा पावडर, बिस्किटस, साबण अंगाचे आणि कपड्याचे, डेटाॅल, औषधे,तांदूळ, गव्हाचे पीठ, तूर डाळ, मूग डाळ, चादरी, टाॅवेल, सॅनिटेन पॅड, सॅनिटायझर, माचिस, मेणबत्ती,खोबरेल तेल, गाऊन,  साड्या, लहान मुलांचे कपडे, मच्छर अगरबत्ती, मीठ, फरसाण, पोहे, कफ सिरप यांचा समावेश होता. शहरात परिस्थिती अत्यंत विदारक होती. तळमजल्यावर असलेली आणि बैठी घरे, व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले होते. जे नागरिक मदत घेऊन जातात ते सर्व बहुतकरून शहरात जातात.यामध्ये ज्यांचे नुकसान झाले नाही ते देखील मदत घेण्यास अग्रेसर असलेले दिसून येत आहेत.ग्रामीण भागात मदत हवी तशी पोहोचली नाही. जे समोर दिसतात त्यांनाच मदत पोहोचत आहे. आड वाटेला जी कुटुंब राहतात ते दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळेच आम्ही दादली तसेच शिरवली येथील काही भाग निवडून त्याठिकाणी या मित्र परिवाराने मदत पोहोचवली. सध्या पूरग्रस्त भागात साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे.त्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित व्हावी. चिखलाचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे.त्यासाठी सामुग्री आणि मनुष्य बळ अपुरे पडते ते वाढलं पाहिजे असे दिसून आले. यासाठी विशाल सावंत यांच्या सोबत धिरज कदम, सुरज मरले, हर्षद नावले, निलेश लोकरे,गणेश लोकरे,सुशांत पाटील,समीर मते, ज्ञानेश्वर पारधी, रूपेश चव्हाण, किशोर विचारे, रितेश सावंत, अनिकेत सावंत, ओंकार जाधव, निशान पाटील, भूषण फेगडे, अमित पुजारी आदींनी प्रयत्न केले.Comments