मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसंपर्क अभियानांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन ....
पनवेल / प्रतिनिधी :- आज दिनांक १० जुलै २०२१ रोजी शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री सन्मानिय उद्धव बाळसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकमत वृत्तपत्र समूह आणि शिवसेना-पनवेल व रामदास शेवाळे प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर सुधागड शाळा सेक्टर १ कळंबोली आयोजित करण्यात आले होते. मा उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस दिनांक २७ जुलै रोजी असून त्यांच्या आदेशानुसार राज्यात शिवसंपर्क अभियान राबवत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन पनवेल आयुक्त  गणेश देशमुख , रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत व जिल्हा सल्लागार  बबनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले. 

सदर रक्तदान शिबिरात ३०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमाला कळंबोली मध्ये उत्स्फूर्द प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी पनवेल आयुक्त मा. गणेश देशमुख साहेब,रायगड जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत साहेब, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा समन्वयक  प्रदीप ठाकुर, उपमहानगर प्रमुख दिपक घरत उपमहानगर प्रमुख कैलास पाटील, शहरप्रमुख डी.एन. मिश्रा, युवासेनेचे विधानसभा समन्वयक  नितिन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, शिवसैनिक योगेश तांडेल, यांच्या सह मोठ्या संख्येने रक्तदाते व शिवसेना कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते...
Comments