युवासेनेचा जबरदस्त विजय,शाळेत घुसून परत घेतले दाखले ; युवासेनेच्या लढ्याला यश....

पनवेल, दि.१२ (वार्ताहर) ः कोरोना महामारीत शिक्षणाचे वर्ग बंद असतानाही खारघर येथील विश्‍वज्योत इंटरनॅशनल शाळेने विद्यार्थ्यांना फि भरण्याचा तगादा लावला होता. तसेच फि साठी छळवणूक करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून काहींना दाखले सुद्धा पाठविले होते. याविरुद्ध युवा सेनाप्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे सहसचिव रुपेश पाटील यांनी विद्यार्थी व पालकांच्या साथीने आवाज उठविला होता व ठिय्या आंदोलन छेडले होते. अखेरीस एक महिन्यानंतर शाळेने नमते घेवून विद्यार्थ्यांना पाठविलेले दाखले पुन्हा माघारी घेतल्याने हा मोठा विजय मानला जात आहे.
यावेळी थेट शाळेत 6 तास पालकांसोबत युवासेना सह सचिव रुपेश पाटील यांनी ठिय्या आंदोलन करून अनधिकृतपणे दिलेले दाखले जो पर्यत शाळा मागे घेत नाही तोह पर्यंत जाणार नाही अशा घोषणा देऊन शाळेत पालकांच्या सोबत ठिया मांडला. शाळेचे प्रशासन बिथरून दिवसभरात शाळेने रुपेश पाटील व पालक यांच्यासमवेत अनेक बैठका पार पाडल्या मात्र कोणत्याही अटी तटी शिवाय दाखले मागे घ्यावेत ह्या मागणीवर युवासेना ठाम राहिली व शेवटी खारघर येथील कोणाच्याही वेठीस न येणारी ’विश्‍वज्योत इंटरनॅशनल शाळा’ अखेरीस नमली. व 1 महिन्याच्या ठोस आंदोलनानंतर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिक्षण मंत्री सौ वर्षा गायकवाड, व अनेक शिक्षण अधिकार्‍यांना सोबत घेऊन हे आंदोलन कोणत्याही अटी तटी शिवाय संपविण्यात आले. याआधी युवासेनेच्या मध्यस्थीने शाळेने बंद केलेले गुगल क्लास व ऑनलाईन क्लास सुरू केले होते मात्र शाळेतून काढलेल्या दाखल्यावर युवासेनेने तीव्र आक्षेप घेतला होता आणि थेट शाळेत घुसून दाखले परत घेतले हा युवासेनेचा जबरदस्त विजय असून ह्यामुळे इतर शाळांना चपराक बसेल अशी भूमिका रुपेश पाटील यांनी घेतली आहे. युवासेनेचे सह सचिव रुपेश पाटील आणि मुख्याध्यापिका यांच्या हस्ते सर्व 28 पालकांना दाखले मागे घेतल्याचे पत्र देण्यात आले. ह्यावेळी शाळेचे वरिष्ठ प्रशासन, समाजसेवक ऍड अक्षय काशीद ,पत्रकार हर्षल भदाणे निकेश घरत उपस्थित होते.

चौकट
फीचा तगादा लावून पालकांवर जुलूम करणार्‍या शाळांना चपराक असून अशा शाळा जर पालकांना वेठीस लावत असतील तर रुपेश पाटील यांनी त्यांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे त्यांनी त्यांचा दूरध्वनी क्रमांक 9820707202 दिला आहे. 
काल पालकांचा विजय झाला असून हा विजय विद्यार्थ्यांच्या हक्काचा आहे आणि त्यामुळे आमदार अनेक स्थानिक पदाधिकारी असून देखील पालकांच्या सोबत युवासेना उभी राहिली म्हणून पालकांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सचिव वरूण सरदेसाई व सह सचिव रुपेश पाटील यांचे आभार मानले.

Comments