पनवेल दि.08 (वार्ताहर)- बेकायदेशीरपणे विनापरवाना देशी दारू जवळ बाळगल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात कारवाई करून त्याच्याकडून दारूसाठा हस्तगत केला आहे. सोमटणे येथे राहणारे लक्ष्मण मेढेकर (वय-32) याच्याकडे देशी दारूचा साठा बेकायदेशीररित्या असल्याची माहिती वपोनि रविंद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राम गोपाळ, नितीन बडगुजर, पोहवा चिकणे, महेश धुमाळ आदींच्या पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी दारूच्या दहा बाटल्या हस्तगत केल्या आहेत व त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र पोलिस दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई केली आहे.
बेकायदेशीररित्या देशी दारू जवळ बाळगल्यामुळे कारवाई.....
• Anil Kurghode
बेकायदेशीररित्या देशी दारू जवळ बाळगल्यामुळे कारवाई.....