वृद्ध इसमास लुटले.....
वृद्ध इसमास लुटले....

पनवेल, दि.१८ (वार्ताहर)- वॉकींगसाठी घराबाहेर पडलेल्या वृद्ध इसमास मोटार सायकलीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी लुटल्याची घटना खारघर वसाहतीत घडली आहे.
        देशराज शर्मा (वय-63) हे वॉकींगसाठी घराबाहेर पडले असताना मोटार सायकलीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी आपण पोलिस असल्याचे सांगून तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून खिशात ठेवा असे सांगून हातचलाखीने सदर चेन काढून घेऊन अज्ञात इसम पसार झाल्याने त्यांच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
Comments