घरफोडीत लाखो रुपये किंमतीचा ऐवज लंपास...
घरफोडीत १ लाख ७ हजार ८०० रुपये किंमतीचा ऐवज लंपास...

पनवेल, दि.२९ (संजय कदम) ः नावडे कॉलनी येथील इलेक्ट्रॉनिक दुकानासह कपड्याच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत लाखो रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
टपू कुमार सुधीर दास (39) यांचे पुजा खुशी इलेक्ट्रॉनिक शॉप नं.6 येथे दुकान असून त्या ठिकाणी सदर दुकान बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी त्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश करून रोख रकमेसह वेेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, ब्ल्यू टुथ, स्पिकर व इतर साहित्य तसेच बाजूच्या ठिकाणी असलेले श्री दत्त गुरु साडी सेंटर शॉप नं.4 या कपड्याच्या दुकानातून साड्या, गावून व रोख रक्कम असा मिळून जवळपास 1 लाख 7 हजार 800 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments