पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने केला स्वराज संजय सोनावणे यांचा सन्मान....

लंडन येथून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी प्राप्त करणाऱ्या स्वराज सोनावणे याच्यावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
पनवेल :- लंडन येथून बिझनेस मॅनेजमेंट ची पदवी प्राप्त करणारे स्वराज संजय सोनवणे यांचे गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. मंचाचे अध्यक्ष माधव पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वराज यांचा सन्मान केला.
      स्वराज सोनावणे हे गेली तीन वर्ष लंडन मधील साऊथ बँक युनिव्हर्सिटी मधून बिझनेस मॅनेजमेंट चा अभ्यासक्रम शिकत होते. अत्यंत प्रतिष्ठित अशा युनिव्हर्सिटी मधून बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण केल्याबद्दल स्वराज यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.स्वराज हे लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय सोनावणे यांचे चिरंजीव आहेत.लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान चे स्वराज हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असून एस आर एस ग्रुप चे सहव्यवस्थापकीय संचालक देखील आहेत.
     पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष माधव पाटील, सल्लागार डॉक्टर संजय सोनावणे, सरचिटणीस मंदार दोंदे,विवेक पाटील,संजय कदम,अनिल भोळे, अनिल कुरघोडे, योगेश पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
      येथून पुढे स्वराज सोनावणे यांना विधी तज्ञ व्हावयाचे असून बॅरिस्टर बनण्याचे त्यांचे ध्येय्य आहे. ते पुढे म्हणाले की,मी जीवनात माझ्या वडिलांना माझा आदर्श मानतो. माझ्या आजोबांचे हे स्वप्न होते की आमच्या कुटुंबीयांपैकी कोणीतरी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे. आर्थिक परिस्थिती तशी बेताची असल्यामुळे माझ्या अगोदरच्या पिढीतील कुणी ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही. परंतु माझ्या वडिलांनी मला लंडनला शिक्षण घेण्यास पाठविले व त्यामुळेच मी माझ्या आजोबांचे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा मला आज अभिमान वाटत आहे.
      डॉ संजय सोनावणे यांनी स्वराज चे अभिनंदन करण्यास आलेल्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या तमाम सदस्यांचे आभार मानले.
      पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने स्वराज यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments