पनवेल दि.28 (वार्ताहर)- सेंट जोसेफ हायस्कूल से.७ नवीन पनवेल या शाळेने सुमारे २५० मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवल्याची तक्रार शिवसेना खांदा कॉलनीचे शहरप्रमुख सदानंद शिर्के यांना मिळाली. शिक्षणापासून वंचित ठेवून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास तसेच शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब अत्यंत गंभीर असल्याने सदर प्रकरण जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात शाळेच्या व्यवस्थापनाची चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शाळेकडे धाव घेतली व मुख्याध्यापिका तुंगेकर यांना सादर प्रकरणाबाबत जाब विचारला.
यावेळेस फी थकबाकी असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस मध्ये समाविष्ट केले नसल्याचे स्पष्टीकरण व्यवस्थापनाकडून देण्यात आले. परंतु हे प्रकरण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अन्याय कारक असल्याने २ दिवसात सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस मध्ये समाविष्ट करून घ्यावे. अशी विनंती केली असता शाळा व्यवस्थापनाने ती मान्य केले. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटीका रेवती सपकाळ, महानगर संघटिका शुभांगी शेलार, युवासेना विधानसभा समन्वयक नितीन पाटील, पनवेल विधानसभा अधिकारी पराग मोहिते, तालुका अधिकारी केवल माळी व शिवसेनेचे, युवासेनेचे पदाधिकारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.