देशी दारूचा साठा हस्तगत ......
पनवेल / दि.18 (संजय कदम)- बेकायदेशीररित्या देशी दारूचा साठा जवळ बाळगल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी करंजाडे येथे एका इसमाविरूद्ध कारवाई केली आहे.
करंजाडे येथील पुष्पकनगर से.-1 परिसरात आरोपी सुरेश जैसवाल याने बेकायदेशीररित्या देशी संत्रा दारूचा साठा जवळ बाळगल्याची माहिती वपोनी अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश दळवी, पोलिस उपनिरीक्षक लाला लोंडकर, पोहवा संजय केरूर, मपोना प्रगती म्हात्रे, पोशि प्रविणकुमार सोनावणे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये कारवाई करून 2910 रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.