दिड किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या धातूची चोरी.......
दिड किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या धातूची चोरी......

पनवेल, दि.13 (संजय कदम) ः अज्ञात चोरट्याने एका दुकानातून दिड किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या धातूची चोरी केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
गणपती पवार यांच्या बांठीया चाळ एम.जी.रोड  पनवेल येथील अटणीच्या दुकानाचे अज्ञात चोरट्याने ग्रीलचे कुलूप व दरवाजाचा कोयंडा कशाने तरी उचकटून आत प्रवेश करून दुकानातील दिड किलो वजनाचा शुद्ध चांदीच्या धातू ज्याची किंमत जवळपास 60 हजार रुपये इतकी आहे. चोेरुन  नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments