चाळीस लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक ...

पनवेल : नवीन पनवेल येथील एका चाळीस वर्षीय महिलेची 40 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार 2019 मध्ये उघडकीस आला होता. गुन्हा दाखल करून यातील दोन आरोपींना खांदेश्वर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे.
          नवीन पनवेल येथील 40 वर्षीय महिलेसोबत सोशल मीडिया वरून आरोपीची ओळख झाली. यावेळी आरोपीने तो अमेरिकीत कस्टम ऑफिसर असल्याचे सांगितले. आणि लवकरच भारतात येणार आहे तिकडून गिफ्ट आणतो असे सांगून फिर्यादी महिलेकडून पैसे उकळले. आणि कस्टम ड्युटी भरायची आहे अशी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून तब्बल 40 लाख ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. फसवणूक झाल्यानंतर संबंधित महिलेने आरोपींविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.  त्यांनतर पोलिसांनी केरळ येथून एका आरोपीला अटक केली. यावेळी त्याला अन्य एका आरोपी महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि पैशांचे अमिश दाखवून बँकेत त्याच्या नावे अकाउंट ओपन करण्यास सांगितले आणि ज्या लोकांची फसवणूक करण्यात येत होती त्यांचे पैसे त्या अकाउंटवर जमा केली जायचे. व त्याचे डेबिट कार्ड आणि एटीएम त्या महिलेने आणि एका नायजेरियन पुरुषाने त्यांच्याकडे ठेवून घेतले.
       नवीन पनवेलच्या महिलेची फसवणूक करून ट्रान्सफर करण्यात आलेले पैसे केरळच्या आरोपीच्या खात्यात गेले व हे पैसे नायजेरियन पुरुष आणि केरळच्या महिला आरोपीने दिल्ली येथून पैसे काढून घेतले. खांदेश्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे आणि धोंडीबा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासाद्वारे आरोपी दिल्ली येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश पोळ व त्यांच्या पथकाने दिल्ली, उत्तमनगर येथे जाऊन नायजेरियन पुरुष (२८) आणि केरळची महिला (२४) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 12 मोबाईल, 6 डेबिट कार्ड, 1 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून समतानगर, मुंबई येथील एक गुन्हा उघडकीस आला आहे. हे सर्वजण आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवत असल्याचे बोलले जात आहे. 
Comments