डॉ. संजय सोनावणे यांचा जन्मदिवस सामाजिक उपक्रमांतून साजरा.....
पनवेल / प्रतिनिधी :-  लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान, महाराष्ट्रचे अध्यक्ष, तसेच पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सन्माननीय सदस्य डॉ. संजय सोनावणे यांचा जन्मदिन सोमवार दिनांक ५ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्यात आला. यावेळी पनवेल तालुक्यातील भोकरपाडा या गावातील जि प शाळेतील मुलांना वह्या वाटप करण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच डॉ. संजय सोनावणे यांच्या वाढदिवसाच्या औचीत्याने माणगाव, लोणेरे, इंदापूर, गोरेगाव,या विभागातील स्वच्छता दूतांना स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले.सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार करण्यात आले, आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले.
     
भोकर पाडा येथे झालेल्या वह्या वाटप कार्यक्रमाला डॉ संजय सोनावणे यांच्या समवेत पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सचिव मंदार दोंदे, संजय कदम, विवेक पाटील, अविनाश कोळी, अनिल कुरघोडे, प्रवीण मोहोकर, राजू गाढे, माजी उपसरपंच धनंजय पाटील, साजन फुलोरे, हनुमान फुलोरे, किशोर फुलोरे, संतोष भोपी, संजय पाटील, चेतन पोपेटा, निलेश नाईक, सुनील राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
      
येथील जि. प शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. संजय सोनावणे म्हणाले की,जन्मदिवस साजरा करत असताना आपण समाजाचे ऋण फेडले पाहिजे या भावनेतून आयोजित या कार्यक्रमात मला विद्यार्थ्यांना काही देता आले त्याचे समाधान आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी मंचाचे आभार मानतो.

चौकट
डॉ संजय सोनावणे यांची यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. मंचाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. संजयजी सोनवणे यांचा प्रशासकीय अधिकारी म्हणून असणारा प्रदीर्घ अनुभव,कुशल संघटक म्हणून त्यांची हातोटी आणि सामाजिक कार्याला वाहून घेण्याचा वकूब याचा संस्थेच्या प्रगतीला निश्चितपणे फायदा होईल असा विश्वास माधव पाटील यांनी व्यक्त केला.

चौकट
कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरी हंट हळूहळू पाय पसरत आहे. त्यामुळे सदर कार्यक्रमाचे वेळी कोरोना प्रतिबंधक उपायांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. येणाऱ्या प्रत्येक मुलाला मास्क,आणि निर्जंतुक द्रव्य हाताला लावून कार्यक्रम स्थळी आणण्यात आले.सामाजिक अंतर राखण्याचे नियम पाळून कार्यक्रम पार पडला.
Comments