मा.उपमहापौर यांच्या पाठपुराव्याने नवीन पनवेल सेक्टर २ व ३ मधील फुटपाथ नुतिनिकरणाच्या स्थगित कामाला पुन्हा सुरवात....

पनवेल / वार्ताहर :- प्रभाग क्र १८ मधील नवीन पनवेल सेक्टर २ व ३ या भागात फुटपाथ नूतनीकरण आणि रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी प्रभाग क्र १८ चे नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने सिडकोला पत्र देण्यात आले होते. यशस्वी पाठपुरावा केल्याने पत्राला सकारत्मक उत्तर देत नवीन पनवेल सेक्टर २ व ३ मध्ये सिडको तर्फे कामाला सुरुवात करण्यात आली होती. 
पण काही काळानंतर काम थंड झाले. पावसाळ्यात फुटपाथ नुतिनिकरणाचे काम अर्धवट राहिल्यामुळे नागरिकांची व जेष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ लागली होती.फुटपाथ खाली ड्रेनेज आहे आणि त्यावर झाकणं नसल्या कारणामुळे अपघात होण्याची आणि शाररीक इजा होण्यात दाट शक्यता निर्माण झाली होती.या विषयाची माहिती नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.विषयाचे गांभिर्य लक्षात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित सिडकोच्या अधिकाऱ्यांशी बोलून  पाठपुरावा घ्याला सुरवात केली. कामाच्या बाबतीत पुन्हा सिडकोला स्मरण पत्र देण्यात आले.नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर सिडकोने फुटपाथ नुतिनिकरणाच्या कामाला पुन्हा सुरवात केली. नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच कार्यतत्पर राहून प्रभागातील समस्या सोडवतात याबद्दल नवीन पनवेल सेक्टर २ व ३ मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
Comments