पनवेल / वार्ताहर :- खारघर येथे राहणारी एक 26 वर्षे युवती फेब्रुवारी 2021मध्ये प्रेम भंग होऊन प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. सदर युवती ट्रेनने प्रवास करीत असताना तीने 'प्रेमसंबंधातील अडचणींवर उपाय पाहीजे असल्यास 9930694360' या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा' असे लिहलेली जाहिरात पहिली.
सदर मोबाईल क्रमांकवर संपर्क साधला असता समोरील इसमाने तो "बाबा कबिर खान बंगाली "असल्याचे सांगीतले व त्याने मेरठ येथील दर्ग्यामध्ये सदर युवतीचा प्रियकर पुन्हा लग्नास तयार होण्यासाठी व त्याचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी काळी जादु करावी लागेल व देवासाठी घुबड, बकरी अशा प्राण्यांचा बळी द्यावा लागेल असे सांगुन वेळोवेळी सदर युवतीकडुन पुजा विधिसांठी लागणार खर्च म्हणून् 4,57,000/- रु घेतले.
हे करुन देखील काहीच फरक पडत नसल्याने नैराश्य आल्याने सदर युवती ने बाबा कबिर खान बंगाली यास दिलेले पैसे परत मागीतले व पोलीसांकडे तक्रार देईन असे सांगीतले त्यावर बाबा बंगाली याने तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेल्यास काळी जादु करुन अपघात घडवुन आणेन व तिला नष्ट करेन असे धमकावल्याने सदर युवतीने खारघर पोलीस ठाणे, येथे गु.रजी. क्र. 233/2021 भा.दं.वि.कलम 420, 417, 506, 507 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ आणी अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळा जादु नियम 2013 कलम 3 अन्वये दि. 01/07/2021 रोजी गुन्हा नोंद केला आहे.
सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. बी.जी.शेखर पाटील मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे प्रवीण पाटील यांनी आदेशीत केले होते. मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष 02 चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे करीत असताना आरोपीचे वेगवेगळे गुगुल पे क्रमांक,बँक अकाउंट क्रमांक वं KYC ची माहीती घेतली तसेच मोबाईल क्रमांक प्राप्त करुन सी.डी.आर. विश्लेषण केले. सदर आरोपीबाबत गुन्हे शाखा कक्ष-02 चे पो.उप.निरी. वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहीतीनुसार सदर आरोपी दि.11/07/2021 रोजी गोविंदनगर, मिरा रोड, ठाणे येथे येणार असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे पो.उप्.नि. वैभव रोंगे, रूपेश पाटील, इंद्रजीत कानू, दीपक डोंगरे, आदिनाथ फुंदे यांनी आरोपी वसिम रईस खान उर्फ बाबा कबीर खान बंगाली वय 33 वर्षे, रा. रुम नं. 102, समर्थ अपार्टमेंट, गोविंदनगर, मिरा रोड मुळ रा. रुम नं. 222, लिसाळी रोड, मेरठ सिटी, जिला- मेरठ, राज्य- उत्तर प्रदेश यास शिताफीने ताब्यात घेतले असता आरोपिने गुन्ह्याची कबुली दिली, तसेच आरोपीचे मोबाईलच्या गुगल पे अकाउंटवर पिडीत मुलीने पाठविलेल्या पैशांच्या एंट्री देखील आहेत.
सदरच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस कधीही फिर्यादी यांनी प्रत्यक्षात पाहिलेले नसताना, तो कसा दिसतो याचेबाबत खात्री नसताना व वारंवार मोबाईल व राहाण्याचे ठिकाण बदलत असतांना देखील गुन्हे शाखा कक्ष 02 चे पथकाने परिश्रम करुन आरोपिचे मोबाईल क्रमांक,बँक अकाउंट, बातमिदारांकडुन माहीती प्राप्त करुन कौशल्यपूर्ण तपास करून गंभीर गुन्हा उघडकीस आणेलला आहे. सदर आरोपीने अशा अनेक लोकांना फसवले असून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नमूद आरोपीने कोणास फसविले असल्यास त्यांनी गुन्हे शाखा व खारघर पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवहान करण्यात येत आहे.