मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने होणार साजरा.....
पनवेल / प्रतिनिधी :-  प्रभागाच्या विकास कामांसोबतच प्रभागातील समस्या सोडवण्यास नेहमी तत्पर असणारे पनवेलचे मा.उपमहापौर आणि प्रभाग १८ चे नगरसेवक विक्रांत पाटील सामाजिक उपक्रमाद्वारे  लोकाभिमुख कामे करीत असतात. १२ जुलै रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेहेमीप्रमाणे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
''माझा प्रभाग, माझी जबाबदारी'' या अनुषंगाने प्रभागचा कायापालट आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहणारे नगरसेवक विक्रांत पाटील आपला वाढदिवस नेहमीच सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात. यंदा देखील मा. उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आपला वाढदिवस पनवेलमध्ये  प्रभागातील विकास कामांचे उदघाटन, वृक्षारोपण, मोफत रोप वाटप, नागरिकांसाठी मोफत होमिओपॅथी आरोग्य चिकित्सा शिबीर, गरजूंना फूड पॅकेट वाटप व वृद्धाश्रमात ब्लॅंकेट वाटप अशा विविध लोकोपयोगी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करणार आहेत. या सर्व उपक्रमांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती देखील नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केली आहे.
Comments