विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप मध्ये इन्कमिंग सुरूच..

    पनवेल / वार्ताहर :-  सध्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रश्न प्रलंबित आहेत. अशा प्रश्नांना घेऊन शेतकरी कामगार पक्ष जनतेच्या सोबत आवाज उठवत आहे. सध्या महानगरपालिका क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने लावलेल्या कर प्रणालीला खांदा कॉलनी येथून नागरिकांचा जोरदार विरोध होत आहे यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी प्रशासनाला वेळोवेळी जाब विचारत नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे.
 विरोधी पक्षनेते  प्रितम म्हात्रे यांच्या नागरिकांसाठी आणि युवकांसाठी सुरू असलेल्या कार्याबद्दल प्रभावित होऊन खांदा कॉलनी येथील  रोहन व्हटकर मित्र परिवार युवा कार्यकर्त्यांनी आज शेतकरी कामगार पक्षा मध्ये प्रीतम म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी रोहन व्हटकर, संतोष कदम, युवराज भोसले, संतोष भोसले, नंदू पवार, लाल मणी, प्रफुल जाधव, यशवंत गावकर , राजन गावकर, राजू तिवारी ,अभिषेक कांबळे ,शुभम नार्वेकर ,शंकर गोवारी ,राहुल नार्वेकर, अशोक हजारे , शैलेश कळसकर, विशाल व्हटकर , सिद्धार्थ लोंढे, अनिल दगडे आणि इतर तरुणांनी प्रवेश केला.
      या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शंकरशेठ  म्हात्रे, मा.उपनगराध्यक्ष गणेश पाटील , शेकाप प.म.पा.जिल्हा कार्याध्यक्ष  महादेव वाघमारे, मा.नगरसेवक शिवाजी थोरवे , मा.नगरसेवक डी. पी. म्हात्रे, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, शेकाप सहचिटनीस नंदकुमार भोईर, खांदा कॉलनी शेकाप अध्यक्ष अनिल बंडगर, शेकाप नेते, महेंद्र कांबळे,श्याम लगाडे, हरिश्चंद्र मढवी,युवानेते मंगेश अपराज हे उपस्थित होते.
       याप्रसंगी तरुणांना मार्गदर्शन करताना श्री प्रितम म्हात्रे म्हणाले की शेतकरी कामगार पक्ष आज पर्यंत तरुणांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आला. जेणेकरून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल . यापुढेही नव्याने पक्षात येणाऱ्या तरुणांसाठी पक्षाच्या मार्फत रोजगार, स्वयंरोजगार साठी योग्य ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. खांदा कॉलनी मधील प्रवेश केलेल्या तरुणांमुळे खांदा कॉलनी शेतकरी कामगार पक्षाला एक नवीन तरुणांची फळी मिळाली याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
       याप्रसंगी प्रवेश करते श्री रोहन व्हटकर यांनी सांगितले की प्रितमदादांनी आजपर्यंतचे शे.का.पक्ष आणि त्यांच्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था या संस्थेमार्फत जे उपक्रम राबवले त्यांचे सुरू असलेले काम पाहून आम्ही सर्व तरुणांनी एकत्रितपणे दादांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश करून पनवेलच्या विकासासाठी त्यांचे हात बळकट करण्याचे ठरवले आणि आम्ही एक मुखाने पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला. पूरग्रस्तांसाठी गेले दोन दिवस दादांच्या माध्यमातून जे मदत कार्यसुरू आहे त्यामध्ये एक आमचा सुद्धा छोटासा वाटा म्हणून आमच्या   पाण्याचे बॉटल पूरग्रस्तांसाठी देत आहोत.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image