एअरटेल कंपनीच्या केबिनमधून बॅटरी बॅकची चोरी...
पनवेल दि. २३ (संजय कदम)- एअरटेल कंपनीच्या ग्राऊंड बेस टॉवरच्या केबिनचे कुलूप तोडून केबिनमधील बॅटरी बॅकची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना धानसर गावाजवळ घडली आहे.
धानसर गावाजवळील केदारनाथ पेट्रोल पंपच्या पाठीमागील असलेल्या जागेमध्ये एअरटेल कंपनीच्या ग्राऊंड बेस टॉवर असून त्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी अमारा राजा कंपनीच्या एकूण 24 बॅटऱ्या असलेले बॅटरी बॅक ज्याची किंमत जवळपास 72 हजार इतकी आहे. चोरून नेल्या आहेत. याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.