जबरी चोरीतील पाहिजे आरोपीस पनवेल गुन्हे शाखे कडून जेरबंद....

 
पनवेल / वार्ताहर :- मा.पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग सो,अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ.बी.जी. शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील यांनी पाहिजे आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना अटक  करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार मा.सहा पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदेशनाखाली  गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल हे पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पो.उप.नि. वैभव रोंगे याना मिळालेल्या बातमी अन्वये पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक २५/२१ कलम ३९२,३९४,४२७,५०४, ५०६,३४,भा. द.वि. या जबरी चोरीच्या गुन्हा मधील पाहिजे आरोपी अशोक उर्फ कांच्या सुधाकर मस्के वय २५वर्ष रा.ठी. कोपरखैरणे नवी मुंबई येथें असल्यांची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वा खाली स पो नि गणेश कराड, पो.उप.नि. वैभव रोंगे, स हा फो.सुदाम पाटील, दीपक डोंगर, रूपेश पाटील यांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता  त्याने खालील गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे
१.पनवेल शहर पो.ठाणे.गुन्हा.रजी.क्र. २५/२१ कलम ३९२,३९४,४२७,५०४,५०६, ३४ भा. द.वि.
२.पनवेल शहर पो ठाणे गुन्हा रजी.क्र. २४/२१ कलम ३७९,४२७भा.द.वि.
नमूद आरोपीस पुढील कारवाई कामी पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे
Comments