कळंबोली परिसरातील घरांच्या मालमत्ता कर वसूलीस स्थगिती देण्याची शिवसेनेची मागणी....
पनवेल दि. २० (संजय कदम)- कळंबोली परिसरातील घरांच्या मालमत्ता कर वसूलीस स्थगिती द्यावी तसेच नुकत्याच अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपायी द्यावी अशी मागणी आज शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत व महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन केली.         
दोन दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टी होऊन कळंबोली येथील एलआयजी तथा केएल 3, 4 व 5 या भागात पाण्याचा योग्य तऱ्हेेने निचरा न झाल्याने घरात तसेच सोसायटीत पाणी साचून गरीब व माथाडी कामगारांच्या घरात पाणी शिरले. तसेच त्यांच्या मालमत्तेचे अपरिमित असे नुकसान झालेले आहे. आधीच कोव्हिड संसर्गजन्य रोगामुळे गरीब लोकांचा आर्थिक कणा मोडला होता. यातच महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे नाले सफाई तथा खराब विद्युत पंपामुळे सामान्य जनतेची घरे पाण्याखाली बुडाली होती. तरी या गरीब जनतेचे अतिवृष्टीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. माथाडी बांधवांचेसुद्धा मोठे नुकसान झाल्याने कळंबोली परिसरातील घरांच्यामालमत्ता कर वसूलीस स्थगिती द्यावी तसेच नुकत्याच अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपायी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.         
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image