बॅन्जोवादक कलाकारांची हक्कासाठी महाराष्ट्र राज्य स्थरावर एकत्र येण्यासाठी मोर्चेबांधणी बैठक संपन्न..

पनवेल / प्रतिनिधी :- राज्यात बेन्जो बँड, नाशिक ढोल, या शुभ कार्यात रोडवर व इतरत्र वाजवणाऱ्या कलाकार असंघटित आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी पनवेल येथे सुनील वानखेडे यांनी पनवेल तालुका स्थरावर दि.१६ जुलै रोजी  पनवेल शेकाप कार्यालयात येथे बैठक संपन्न झाली. 
या बैठकीत पनवेल परिसरातील तसेच मुंबई चेंबूर परिसरातील बेन्जो पार्टीचे कलाकार उपस्थित होते यात सर्व बेन्जो, बँड, नाशिक ढोल च्या कलाकारांनी एकत्र येण्याचे आवाहन केले असून आगामी काळात मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी अश्या बैठका घेऊन सर्व कलाकारांना एकत्र आणून कलाकारांची हिताची एक नाव ठरवून रजिस्टर करण्याचा मानस असून विभागानुसार कमिटी स्थापन करण्यात येणार आहे,आता पर्यंत विखुरलेले शासकीय योजने पासून लांब राहिलेले त्यांना न्याय हक्कासाठी व मूलभूत प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवाहन यावेळी करण्यात आले.
 या बेन्जो कलाकारांना शेकाप नेते देवा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून ते या कलाकारांनसाठी सदैव पाठीशी राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून पुढील काळात बेन्जो वादक कलाकारांच्या पाठीशी शेकाप पूर्ण पणे पाठीशी असेल असे ही सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला उपस्थित बेन्जो बँड नाशिक ढोल वादक कलाकार सुनील वानखेडे, अजय मातोड, रमेश काळे, सचिन आठवले, सुरेश जाधव, बाळा जाधव, रोहित पवार, वैभव घोलप, शुभम सातपुते, अन्सार फक्की, विजय पगडे, प्रसाद शिरधनकर, जितू वाहूळे, ,सचिन कांबळे,अमित जाधव,सुशांत वंळजू, रुद्धश गोवारी, सिध्दांत कांबळे इत्यादीच्या उपस्थित बैठक पार पडली.
Comments