पनवेल वैभव / प्रतिनिधी :- आज पनवेल तालुक्यातील सावित्रीची लेक, क्रांतीज्योत महिला विकास फाऊंडेशन व पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनेलच्या संपादीका, समाजसेविका, डॅशिंग लेडी रूपालीताई शिंदे यांची आजाद समाज पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती आज दिनांक १४/७/२०२१ रोजी करण्यात आली . तसेच विद्याताई जाधव यांची पनवेल प्रभाग क्रमांक 18 साईनगर विभाग प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली. रूपालीताई शिंदे व विद्याताई जाधव यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा नेहाताई शिंदे, महाराष्ट्र कोषाध्यक्षा/ रायगड जिल्हा प्रभारी राजश्रीताई अहिरे, रायगड जिल्हा संघटक जयश्रीताई पाटील, कळंबोली शहर उपाध्यक्षा संगिताताई कांबळे सह क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या खजिनदार किरण अडागळे, विचुंबे विभागीय अध्यक्ष रत्नमाला पाबरेकर , सदस्या श्रीमती स्नेहा धुमाळ, प्रतीक्षा सह कार्यकर्त्या सहकारी उपस्थित होत्या.