लुटमार करणार्‍या तीन आरोपींना अटक.....
लुटमार करणार्‍या तीन आरोपींना अटक......

पनवेल, दि. ४ (वार्ताहर) ः एका गाळ्यामध्ये झोपलेल्या व्यक्तीला आतमध्ये घुसून मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व कपाटातील रोख रक्कम चोरुन नेल्या प्रकरणी खांदेश्‍वर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
नवीन पनवेल सेक्टर 13 अयप्पा मंदिर समोरील ए टाईप येथील एका गाळ्यामध्ये त्रंबक दहातोंडे हे झोपले असताना यावेळी तीन आरोपींनी बाहेरुन त्यांचा दुकानातील शटर वाजविले. त्यानंतर दहातोंडे यांनी शटर उघडताच आरोपींनी आत घुसून त्यांना मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या गळ्यातील 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन व रोख रक्कम 45 हजार चोरुन नेले होते. याबाबतची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करताच वपोनि देवीदास सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे व त्यांच्या पथकाने आरोपी शहानवाझ मोहम्मद अस्लम शेख उर्फ शानू, सहमद अमरजित अंन्सारी व रोशनकुमार गटरु नट यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Comments