जन आधार धर्मदायी संस्थेचा अनोखा उपक्रम; दरमहा शंभर रुपये जमा करून निराधार मुलांना आधार..

पनवेल :-  दिनांक 29/7/2021
रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्ञान मंदिर  शाळा कळंबोली येथे आज दोन मुलांना शैक्षणिक मदत करण्यात आली, प्रथमेश आशोक जाधवर व प्रतिक्षा अशोक जाधवर अशा या दोन मुलांना वडील नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती उद्भवल्यामुळे आहे त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी जनाधार धर्मदाय संस्थेच्या सर्व सभासदांनी पुढाकार घेतला, यावेळी संस्थेचे मानकर सर, नितीन भगत, नितीन पाटील,अर्चना पाटील, कृपा रांधे, आशिष जाधव, ऋतुजा आदी उपस्थित होते.
शाळेतल्या मुख्याध्यापकांनी जनाधार धर्मदायी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले आणि संस्थेच्या सर्व सभासदांना असेच कार्य करत राहण्याबद्दल  शुभेच्छा दिल्या तसेच मुलांच्या आईने भाऊक होऊन जन आधार संस्थेच्या सर्व सभासदांचे आभार मानले.
Comments