मोबाईल फोन खेचण्याच्या प्रयत्नात चाकूने हल्ला....
मोबाईल फोन खेचण्याच्या प्रयत्नात चाकूने केला हल्ला

पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः तिघा मित्रांवर हल्ला करून त्यांच्याकडे मोबाईल फोन जबरीने खेचण्याचा प्रयत्न करत असताना त्याला विरोध केल्याने जमलेल्या इतर तिघांनी त्याच्या हातावर चाकूने मारुन जखमी केल्याची घटना शहरातील मालधक्का पटरीजवळ घडली आहे.
सचिन चव्हाण (18) हा त्याच्या मित्रांसह पनवेलवरुन देवद गावाकडे जात असताना पनवेल रेल्वे स्टेशन मालधक्का पटरीजवळ चार आरोपींनी सचिन चव्हाण व त्याच्या मित्रावर हल्ला करून त्यांच्याकडील मोबाईल फोन जबरीने खेचण्याचा प्रयत्न केला. त्यास त्यांनी विरोध केल्याने त्या तिघांनी त्यांच्या हातातील चाकूने मारुन सचिन चव्हाणसह सिद्धोधन पाईकराव, अनिकेत साळवी या तिघांना जखमी केले आहे. याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments