जोपर्यंत खांदा कॉलनीला मिळत नाही मुबलक पाणी तोपर्यंत शेकापची सिडको विरोधात आणि बाणी ; महादेव वाघमारे यांचा आक्रमक पवित्रा

पनवेल / वार्ताहर :- शेकापचे पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सिडको नवीन पनवेल कार्यालयावर हंडा मोर्चा होणार आहे 
गेल्या महिन्याभरा पासून खांदा कॉलनीतिल नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही ,अनियमितता व कमी दाबाने पाणी येत आहे ,सोसायट्यांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत काही सोसायट्यांना पाणी पूरवठाच होत नाही , तसेच तीस वर्षापासूनची जुनी झालेली पाईपलाईन बदलावी शेकापचे पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष यांनी खांदा कॉलनीतील पाणी समस्या बाबत आक्रमक भूमिका घेत निवेदन देण्यासाठी सिडकोला वाघमारे यांचे शिष्टमंडळ गेले असता सिडको अधिकारी जागेवर नसल्याने अधिकाऱ्याचा केबिन ला निवेदन चिटकवले होते 
        याबाबत शनिवार दि 10 जुलै 2021 रोजी सिडको पाणीपुरवठा अधिकारी यांनी खांदा कॉलनी ला भेट देऊन पाणी पुरवठा सुरळीत करणार आहेत असे आश्वासन दिले आहे यावेळी
माजी उपनगराध्यक्ष श्री गणेश पाटील पनप ,नगरसेविका पमपा सौ कुसुम पाटील,शेकाप चे पनवेल महापालिका कार्याध्यक्ष महादेव वाघमारे, अनिल बंडगर, किरण घरत,मारुती शिर्के, नागेश शेट्टी, उपस्थित होते.

तसेच शेकाप कडून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला पण "जोपर्यंत खांदा कॉलनीला मिळत नाही मुबलक पाणी तोपर्यंत शेकापची सिडको विरोधात आणि बाणी" असा आक्रमक पवित्रा शेकापचे पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी घेतला आहे.
Comments