रिक्षाची चोरी......
रिक्षाची चोरी.....

पनवेल, दि.२० (संजय कदम) ः शहरातील कुलकर्णी हॉस्पिटलसमोर उभी करून ठेवलेली रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
देवदत्त रोटे (48) यांची 45 हजार रुपये किंमतीची काळ्या पिवळ्या रंगाची ऑटो रिक्षा क्र.एमएच-46-एसी-3924 ही शहा प्लाझा बिल्डींग कुलकर्णी दवाखान्याजवळ प्रभु आळी येथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर रिक्षा चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments